महाराष्ट्र

Assembly Election: संगमनेर तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Vikhe Patil vs Thorat : राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेलाय. विखे-पाटील यांनी आता थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.

Bharat Jadhav

सचिन बनसोड, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुका चांगलाच चर्चेत आलाय. त्याचं कारण ठरलंय बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर. सुजय विखे पाटील यांच्या सभेत जयश्री थोरात यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे अहमगनगर जिल्ह्यातील वातावरण तापलय. त्याच गोष्टीवरून आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता काँग्रेस नेते यांच्यावर शरसंधान साधलंय.

सुजय विखेंच्या सभेत जे वक्तव्य झालं त्याबद्दल आम्ही स्पष्टीकरण दिलंय. वसंतराव देशमुखांनी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध केलाय, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेबत थोरात यांच्यावर निशाणा साधलाय. देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्राचा भाग वाटत आहे. विधान व्हायरल होताच अर्ध्यातासात थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या कुऱ्हाडी होत्या. त्यांना डॉ.सुजय वरच प्राणघातक हल्ला करायचा होता.

संगमनेर तालुक्यात सुजयची लोकप्रियता वाढलीय. त्यांच्या बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या वर्ष त्यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्या. एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू अशी टीका विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर केलीय.

मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल

जयशी थोरात यांच्यावरील विधानाबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले, माझ्या आणि सुजयच्या सार्वजनिक जीवनात आम्ही कधीही अशी वक्तव्य केली नाही. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करणं हे सुनियोजित होतं. महिला आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली, याची चौकशी झाली पाहिजे. याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल असं ही विखे-पाटील म्हणाले. थोरात यांचे कार्यकर्तेच तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा सुरू असल्याचंही ते म्हणाले.

तालुक्याचे मालक होऊ नका

आम्ही देशमुखांच्या वक्तव्याने समर्थन केलेच नाही. वसंतराव देशमुख यांना अटक झाली आहे. त्याला आम्ही लपवला हा आरोप चुकीचा आहे. तुमच्या लोकांनी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. विखेंना गावबंदी आणि तालुका बंदी करण्याची भाषा करत आहात. तुमच्या बापाची इस्टेट आहे का? तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका. जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विखे पाटील यांनी थोरात यांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT