महाराष्ट्र

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

Deceased Teacher Appointed Polling Officer: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरूय. याचदरम्यान मोठा घोळ समोर आलाय. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी नांदगाव तालुक्यातील एका मृत शिक्षकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. धक्कादायक प्रशासकीय चूक समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • मालेगाव मनपा निवडणुकीसाठी मयत शिक्षकाची थेट नियुक्ती

  • संतोष शिवाजी बोरसे यांचे चार महिन्यांपूर्वी निधन

  • प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठी नामुष्की

राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. निवडणूक कामासाठी वेगवगेळ्या नियुक्त्या नियुक्त्या दिल्या जात आहेत. मात्र या नियुक्त्यां करण्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. मालेगाव मनपा निवडणुकीसाठी नांदगाव तालुक्यातील एका मयत शिक्षकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे मयत शिक्षक साकोरा येथील आहेत. या मयत शिक्षकाची थेट मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

साकोरामधील या मयत शिक्षकाचे नाव आहे, संतोष शिवाजी बोरसे. बोरसे यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झालंय. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केंद्र क्रमांक ४८ वरील मतदान पथकात चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलाय. यात मयत संतोष बोरसे यांचाही समावेश करण्यात आलाय.

हे नियुक्ती पत्रक मनपाचे प्रशासक रविंद्र जाधव यांनी काढले आहे. त्यामुळे नांदगाव तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. हा आदेश आता नेमका कुणाला आणि कसा बजावायचा असा प्रश्न पडला आहे.

मालेगाव महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकाच्या नियुक्तीची जबाबदारी ही नांदगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर सोपवलीय. शिक्षण अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळेच ही नियुक्ती करण्यात आल्याचा खुलासा करत कर्तव्यात कसूर करत प्रशासनाला चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत शिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. येत्या २४ तासात त्याचा खुलासा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडून देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late Dinner Effect: रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक, तरुणावर झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: सांगलीत शेतकऱ्यांचा एल्गार

Skin Care Tips : स्वस्तात मस्त टोमॅटो करेल १० मिनिटांत टॅनिंग दूर, तुम्ही महागडे स्कीन प्रोडक्ट फेकून द्याल

Nath Blouse Design: नथीच्या डिझाईनमध्ये ब्लाऊजचे 5 प्रकार, मराठमोळा लूकवर शोभून दिसेल

SCROLL FOR NEXT