Maharashtra Election 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Election 2025: नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांबाबत महत्वाची बातमी, उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल

Nagarparishad–Nagarpanchayat Election: आगामी नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय

  • उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशनाची सवलत देण्यात आली

  • शनिवारी-रविवारीही दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार

  • २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांना लागू

गणेश कवाडे, मुंबई

आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांना ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या अर्ज भरता येणार आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहे. याबाबतचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती.

या मागणीनंतर त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT