Maharashtra Drought weather
महाराष्ट्र

Maharashtra Drought: मराठवाड्याच्या दुष्काळ कथांनी महाराष्ट्र सुन्न; राज्याचे कृषीमंत्री आहेत कुठं?

Maharashtra Drought: राज्याच्या अनेक भागात उन-पावसाचा खेळ सुरु आहे. अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. मराठवाडा दुष्काळाच्या विळख्यात असताना कृषीमंत्री आहेत कुठे ? असा सवाल उपस्थित होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

मुंबई : राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीये. अनेक छोटे, मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक गाव-खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मराठवाडा दुष्काळाच्या विळख्यात असताना कृषीमंत्री आहेत कुठे ? असा सवाल उपस्थित होतोय. पाहूया एक रिपोर्ट.

राज्याच्या अनेक भागात उन-पावसाचा खेळ सुरु आहे. मराठवाड्यात मात्र सूर्य आग ओकतोय. अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडत आहे. गाव-खेड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील साठा येत्या 10 दिवसात मृत साठ्यावर पोहचण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडीत केवळ साडेपाच टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरासोबतच जवळपास साडेचारशेहून अधिक गावांची तहान या साठ्यावर भागवावी लागणार आहे.

19 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचा परिणाम आहे

73 टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत आहे

1500 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलाय

संभाजीनगर मध्ये 1561 टँकरची मागणी आहे

बीड, बुलडाणा, संभाजीनगर आणि नंदुरबारमधील ही दृश्य पाणीटंचाईची दाहकता दाखवण्यासाठी पुरेशी आहेत. बीडमध्ये एकूण 52 प्रकल्प कोरडेठाक पडलेत. 54 प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा असल्याचं चित्र आहे. तर हिंगोलीच्या पैनगंगा नदीचं पात्र कोरडंठाक पडलंय. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादला मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र या बैठकीलाही अनेक मंत्री अनुपस्थित होते. यावरुन शरद पवार यांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधलाय.

राज्यात दुष्काळ, नेते टूरवर?

राज्य दुष्काळाच्या विळख्यात असताना नेते मात्र आपल्याच दुनियेत मश्गूल आहेत.

मंत्री सध्या कुठे आहेत?

धनंजय मुंडे, परदेशात जाण्याच्या तयारीत

अब्दुल सत्तार, परदेशात

अतुल सावे, देवदर्शनाला

संजय बनसोडे, देवदर्शनाला

नंदुरबारच्या कुलीडाबर परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतोय. एका छोट्या झ-यावर तहान भागवावी लागत आहे. पुण्यातही पाणीप्रश्न पेटणार असल्याची शक्यता आहे. खडकवासला धरणांतील पाण्यानं तळ गाठलाय. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत सध्या 21.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुरंदरच्या जेजुरीजवळील नाझरे धरणही कोरडं ठाक पडलंय. अशा सगळ्या स्थितीनं गाव-खेड्यातले डोळे पाणावलेत. निवडणुकाही संपल्या आहेत. आता तरी नेत्यांनी आणि प्रशासनानं उपाययोजना करावी, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT