राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणं अद्याप बाकी आहे. पावसाची मोठी तूट असल्याने बळीराजाचा आक्रोश आहे. अशातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी अजब विधान केलंय. मंत्र्यांच्या आवाहनावरुन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. अहिल्यानगरमधील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेत विखेंनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते पाहूयात...
खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी हतबल झालाय.मंत्र्याच्या अजब विधानानं शेतकरी संघटना आक्रमक झालीये. विखे-पाटलांच्या विधानावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे, विखेंनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटलेत. खासदार संजय राऊतांनी खोचक टीका केलीये...
राज्यभरातील वाढ रोष पाहता, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी आपल्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय... नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या दुष्काळाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदामवर ताव मारला होता. संभाजीनगरमध्ये दौऱ्यात मंत्र्यांचे फुलांच्या पायघड्या घालून स्वागत झाले. तर अकोल्यातल्या कृषीमंत्र्यांच्या बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलवर ऑनलाईन साईट पाहण्यात व्यस्त दिसले होते. आधीच या असंवेदनशीलतेवरुन संताप व्यक्त होत असताना विखेंचं विधान आगीत तेल ओतणारं आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नुकसानभरपाईचा निर्णय प्रलंबित असल्यानं प्रत्यक्ष निधी खात्यात कधी जमा होणार, याकडे बळीराजाचं लक्ष लागलेलं असताना मंत्री महोदय मात्र अजब विधानं करण्यात व्यस्त आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.