Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान बारामतीत दुर्घटना, VIDEO समोर

Ajit Pawar Plane accident: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झाला. बारामतीत ही घटना घडली. लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात

  • या घटनेत अजित पवार आणि सुरक्षारक्षक सुरक्षित आहेत

  • अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये ही घटना घडली. लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले आहेत. बारामतीमधील या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानाने गेले. बारामतीमध्ये विमान लँडिग करत असताना अपघात झाला. अजित पवारांचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आणि आग लागली. या विमानाचे तुकडे झाले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात ३ ते ४ जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना बारामतीमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ अन् फोटो समोर

Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Skin Care : चेहऱ्यावरील डाग कमी करायचे आहेत? मग वापरा 'हा' मॅजिकल फेसपॅक

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या विमानाला अपघात

SCROLL FOR NEXT