Ajit Pawar: ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांचा खळबळजनक दावा

Deputy CM Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. त्यावेळी ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, असे विधान त्यांनी केले.
Ajit Pawar: ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांचा खळबळजनक दावा
Deputy CM Ajit Pawar Saam tv
Published On

Summary:

  • अजित पवार यांनी पुण्यातील प्रचार सभेत मोठं विधान केले

  • अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात खळबळजनक विधान केले

  • ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, असे ते म्हणाले

  • अजित पवारांनी जुन्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला

सिंचन घोटाळ्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. या सिंचन घोटाळ्यासंदर्भातच अजित पवार यांनी पुण्यातील एका प्रचार सभेत खळबळजनक खुलासा केला. १९९९ मध्ये जलसंपदामंत्री असताना पुरंदर उपसा सिंचन योजनेची ३१० कोटींची फाईल समोर आली होती. वास्तविक खर्च २०० कोटी असताना मागील युती सरकारने १०० कोटी रुपये 'पार्टी फंडा'साठी वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला. ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, असं म्हणत त्यांनी जुन्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ साली आली होती. पण त्या आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली होती असा आरोप अजित पवार यांनी केली. या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपये असल्याचे एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत १०० कोटी मागितले. त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वत:चे १० कोटी जोडून २०० कोटींच्या प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये केली होती, असा आरोप अजित पवारांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar: ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दावा करत सांगितले की, '१९९९ साली जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले होते. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी ती फाईल पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचे आढळून आलं होतं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले होते.'

Ajit Pawar: ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar : ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवार स्पष्ट बोलले, भाजपच्या आरोपाला नेमकं काय दिले प्रत्युत्तर, पाहा

तसंच, 'या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे त्या अधिकाऱ्याने कबुल केलं होतं. पुढे त्या अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता. कारण माझ्याकडे पुरावे होते. त्या फाईलवर सह्या होत्या.'

Ajit Pawar: ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता, सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com