Chief Minister Eknath Shinde on Delhi Assembly Elections SaamTV
महाराष्ट्र

आपचे १५ आमदार शिवसेनेकडून लढायला तयार होते, पण...; एकनाथ शिंदेंनी सांगितली निवडणुकीआधीची इनसाइड स्टोरी

Eknath Shinde on Delhi Election : आपचे १५ विद्यमान आमदार धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढवाला तयार होते. मात्र, भाजप आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याने आम्ही उमेदवार दिले नाही.

Prashant Patil

मुंबई : दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं देखील मनापासून अभिनंदन. मोदीजींच्या गॅरंटी का कमाल आहे, असं बोललं तर वावगं ठरणार नाही. मोदीजींच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. २७ वर्षानंतर भाजपने हा विजय मिळाला. १० वर्षांचं दिल्लीकरांवरील आपच संकट दूर झालं आहे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या विजयावर भाष्य केलं आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले की, खोटं नरेटिव्ह पसरवन्यांना चारी मुंड्या चीत केलं. अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचार विरोधात केजरीवाल यांनी आंदोलन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. मात्र, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले, घोटाळे केले, अण्णांना दूर केलं. या निवडणुकीत आत्ताच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो अर्थसंकल्प सादर केला त्याचं प्रतिबिंब उमटलं आहे. आता दिल्लीकरांवरची आबदा आणि संकट टळलं. आता डबल इंजिन सरकार मिळून काम करेन. काँग्रेसने फेक नरेटिव्ह पसरवलं म्हणून त्यांचा भोपळा फुटला नाही, असं देखील शिंदे यावेळी म्हणाले.

याचदरम्यान, शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे, ते म्हणजे, आपचे १५ विद्यमान आमदार धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढवाला तयार होते. मात्र, भाजप आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याने आम्ही उमेदवार दिले नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

भारताला महासत्ताकडे जाण्यापासून कोणी आता रोखू शकत नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिलं. काही लोकं म्हणतं होते ही लाट कसली पण ही महालाट आहे. ते लोकं सगळे एकत्र खुर्चीसाठी येतात, देशाच्या विकासासाठी येत नाहीत. जेव्हा कर्नाटक आणि तेलंगणा लोकसभेत त्यांना विजय मिळाला तेव्हा इव्हीएम चांगलं होतं. विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएम आणि न्यायालयावर खापर फोडलं.

महाराष्ट्र विकासाचं आणि जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवत आहे. केजरीवाल यांची सुरुवातीला भ्रष्टाचार विरोधी लढणारे अशी ओळख होती. पण त्यांनी भ्रष्टाचार घोटाळे केले. लोकांनी त्यांचा चेहरा ओळखला, असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

SCROLL FOR NEXT