निवडणूक काळात घोषणा केलेल्या लाडकी बहिण योजनेची पूर्तता, विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जून अखेरीसच कर्जाचा आकडा 8 लाख 55 हजार 397 कोटी रुपयांवर पोहचला आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच सरकारने 24 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. लाडकीसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून शेतकरी कर्जमाफीचीही मागणी जोर धरू लागलीय. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी 65 हजार कोटी द्यावे लागणार आहेत. गेल्या चार वर्षात व्याजापोटी किती हजार कोटी भरावे लागले आहेत ते.
व्याजापोटी द्यावे लागणार 65 हजार कोटी (HEADER)
2022-23
41, 689
2023-24
45,652
2024-25
54,687
2025-26
64,659
राज्यावर कर्जाचा भार असला तरी विकसित महाराष्ट्राचं व्हिजन मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं महसूलमंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. स्टेट बँक ऑफ इंडीयानं एका अहवालात लाडकी बहिण सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र सरकारची आर्थिक घडी विस्कटू शकते असं म्हटलं होतं. त्याचा प्रत्यय येतोय. निधी नसल्यामुळे विकास कामे ठप्प असल्याची ओरड आहे. निधीच्या कमतरतेवरून महायुतीतल्या मंत्र्यांमध्ये धुसफुस सुरु आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास असलेले मुख्यमंत्री फडणवीस कर्जाचा डोंगर कसा कमी करतात आणि उत्पन्न कसे वाढवतात ? ते पाहणं महत्वाचं आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.