Chhatrapati Sambhajinagar Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे पिवळं रेशन कार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बनावट रेशन कार्ड

  • जिल्हा पुरवठा विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस तपास सुरू

  • कार्डमध्ये शिंदे कुटुंबातील सदस्यांची नावे नमूद

  • बनावट रेशन कार्ड रॅकेटचा शोध सुरू

Chhatrapati Sambhajinagar Eknath Shinde Yellow Ration Card छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पिवळे रेशन कार्ड बनवण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते. या बनावट रेशन कार्डमधील तपशील, त्यामधील माहिती पाहिली असता मूळ रेशनकार्डाप्रमाणेच ते तयार करण्यात आल्याचं समोर आलं.

अशी रेशनकार्ड बनतात कुठे? आणि ती कोण बनवून देतं? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे रेशनकार्ड कोणत्याही शासकीय कार्यालयातून तयार करण्यात आलं नसून ते बनावट असल्याचं निष्पन्न झाल्यानं बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या टोळक्याचा शोध घेण्याची मागणी जलील यांच्याकडून करण्यात येत आहे.

या पिवळ्या रेशनकार्डमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे , सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे रेशनकार्ड हस्तलिखित स्वरुपातील असून, गेल्या दोन वर्षांपासून वापरलं जात आहे. आता याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद केली आहे. हा प्रकार १२ मार्चला उघडकीस आला असून अजून हे रॅकेट कुठेकुठे सक्रिय आहे आणि राज्यात अशी किती रेशनकार्ड बनावट आहेत याचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune New Metro: पुणेकरांना अजून एक नवी मेट्रो मिळणार! मे महिन्यात होणार सुरु; वाचा सविस्तर

Shocking: लैंगिक विकृतीतून तरुणाने गुदाशयात घुसवली पाण्याची बाटली, ३६ तास असह्य वेदना, १ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर वाचले प्राण

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला फक्त ५ मिनिटांत नेसा नऊवारी साडी; 'ही' घ्या सोपी ट्रिक, सर्वात सुंदर दिसेल तुमचा मराठमोळा लूक

Backless Blouse Designs: लग्नात सुंदर दिसण्यासाठी ओपन बॅक स्टाईल ब्लाऊज, नवरीचा लूक दिसले भारी

SCROLL FOR NEXT