Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra : राष्ट्रवादीसोडून १४ जण भाजपच्या वाट्यावर, यादी पाहून अजित पवार नाराज; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

Maharashtra Political News : पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या संभाव्य प्रवेशावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाजपकडून राष्ट्रवादीतील नेत्यांच्या प्रवेशाला वेग

  • १४ माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा

  • अजित पवारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त

  • पालिका निवडणुकांपूर्वी महायुतीतील तणाव उघड

सागर आव्हाड, पुणे

राज्यात सध्या आगामी पालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच अनेक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी हालचालींना वेग आला असून तशा स्वरूपाचं वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. तर दुसरीकडे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील १४ माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांनी समाजमाध्यमांवरून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथील भाजप कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माजी नगरसेवक धनवकडे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सोशल माध्यमातून व्हायरल झाली आहे. धनकवडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील अन्य नेत्यांचाही पक्ष प्रवेश अपेक्षित असून त्यांची नावेही शुक्रवारी जाहीर होतील, अशी प्रतिक्रिया भाजपमधील बड्या नेत्याने व्यक्त केली.

अजित पवार यांच्या पक्षातील खडकवासला, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर आणि शिवाजीनगर मतदारसंघातील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. निवडून येण्याची खात्री वाटत असल्याने बहुतांश नेत्यांकडून भाजपमध्ये प्रवेश मिळवून उमेदवारी कशी मिळेल, यासाठी आटापिटा सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचीही नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १४ माजी नगरसेवकांची नावे अजित पवारांना सांगण्यात आली आहेत. या नेत्यांच्या सध्याच्या प्रचारातून पक्षाचे चिन्हच गायब झाल्याचे त्यांना दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच या संभाव्य इनकमिंगबाबत नाराजी व्यक्त केल्याची राष्ट्रवादीत चर्चा आहे. प्रवेशांवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक, तर राष्ट्रवादीला दुसरा न्याय, असाही प्रश्न राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?

Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षित करणं आत्ताच टाळा

SCROLL FOR NEXT