Saint Indradev Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra News: महाराष्ट्र हादरला! संत इंद्रदेव महाराजांचं भयंकर कांड, आश्रमात बोलावून महिलेवर लैंगिक अत्याचार

Saint Indradev Maharaj: इंद्रदेव महाराज यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महाराजांनी आश्रमात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्यातार केले.

Priya More
  • संत इंद्रदेव महाराज यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप

  • पुण्यातील आश्रमात महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप

  • काशिमीरा पोलीस ठाण्यात संत इंद्रदेव महाराजांविरोधात तक्रार

सागर आव्हाड, पुणे

धार्मिक प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून एका महाराजाने महिलेचा विश्वास संपादन करून तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यातील वृंदावन येथील संत इंद्रदेव महाराज यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. मिरारोड येथील ४२ वर्षीय महिलेने पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. दीक्षा देण्यापासून ते आश्रमात बोलावून कथित अत्याचार करणे, व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्ये करणे आणि नंतर बदनामीची भीती दाखवून धमकावणे, असा संपूर्ण घटनाक्रम महिलेने पत्रकार परिषदेत सांगितला.

महिलेने केलेल्या आरोपानुसार, जानेवारी २०२३ मध्ये सोशल मीडियावर महाराजांचे प्रवचन पाहिल्यानंतर ती त्यांच्या संपर्कात आली. एप्रिल २०२३ मध्ये सांताक्रूझ येथील सत्संगात सहभागी झाल्यानंतर तिने महाराजांकडून दीक्षा घेतली. पुढे आपल्या वैयक्तिक अडचणी सांगितल्यानंतर त्या दूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने तिचा महाराजांवरील विश्वास वाढला. त्यानंतर महाराजाने या महिलेला आश्रमात बोलावून अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. वृंदावन येथील सेवाधाम आश्रमात मुक्कामासाठी गेलेली असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महाराजांनी फोन करून आपल्या खोलीत बोलावल्याचा आरोप महिलेने केला आहे. कोणाला विचारल्यास औषध घेण्यासाठी जात असल्याचे सांग, असेही त्यावेळी सांगण्यात आले.

खोलीत गेल्यानंतर दरवाजा बंद करून महाराजाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे महिलेने आपल्या जबाबात म्हटले आहे. व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्ये रेकॉर्डिंगचा दावा इतकेच नव्हे तर २९ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्ये केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. व्हिडीओ कॉलवर समोरून स्वतःचे कपडे काढून महिलेलाही तसे करण्यास सांगितल्याचे तिने म्हटले आहे.

महिलेने केलेल्या आरोपांनुसार, महाराज तिच्या घरातील मालमत्तेबाबतही चौकशी करत होते. आपल्याला मुलगा नसल्याने तिच्या लहान मुलीला मुलीसारखे सांभाळण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचेही तिने सांगितले. धार्मिक श्रद्धेच्या माध्यमातून जवळीक निर्माण करून तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप महिलेने केला आहे. रेकॉर्डिंग बाहेर गेल्यानंतर धमकावल्याचा आरोप आपल्यासोबत घडलेला प्रकार दुसऱ्या महिलेला सांगितल्यानंतर महाराजांनी संपर्क साधून रेकॉर्डिंग का पाठवले?, अशी विचारणा केली.

सोशल मीडियावर बदनामी झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे, तसेच १७ जून २०२६ रोजी 'तुम्हे छोडूंगा नहीं' असे म्हणत धमकावल्याचे महिलेने सांगितले. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनाही काही सांगितले नाही. मात्र, अखेर धाडस करून महिलेने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली असून काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणी महाराजाविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत एका महिलेचे कथित शोषण झाल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आता या आरोपांची पोलिसांकडून चौकशी होऊन सत्य समोर येणार का, याकडे लक्ष लागले आहे. हे सर्व आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : सत्तेत असून मोर्चे कसले काढताय? राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

digestion boosting drinks: कोल्डड्रिंक्स सोडा, हे ७ नैसर्गिक ड्रींक वाढवतील तुमची इम्युनिटी आणि एनर्जी

Maharashtra News Live Update : ठाण्यातील मुंब्रा परिसरात शाळकरी मुलांची फ्री स्टाईल हाणामारी

Shani Vakri 2027 : २०२७ मध्ये शनीची उलटी चाल! १३८ दिवस या ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

Car Engine: थंडीच्या दिवसांत गाडी सुरू केल्यानंतर इंजिन किती वेळ गरम करावं?

SCROLL FOR NEXT