Covid update  Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका कायम; अशी आहे आजची ताजी आकडेवारी

राज्यात कोरोना (Corona) विषाणूचा धोका कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, शुक्रवारी १७ जून रोजी महाराष्ट्रात ४,१६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) विषाणूचा धोका कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, शुक्रवारी १७ जून रोजी महाराष्ट्रात ४,१६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २१,७४९ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. ( Maharashtra Covid Update Latest News In Marathi )

राज्यात आज दिवसभरात ३०४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाने बरे झालेल्यांची संख्या ७७,५८,२३० इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या १,४७,८८३ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.८६ टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर १.८६ टक्के इतका आहे.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई (Mumbai) विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात ३६०१ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ३७८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज २३नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात १० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १० रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ९७ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT