eknath shinde and uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

शुभेच्छा, चिमटे आणि 'उद्धव ठाकरेसाहेब'; आमदारांच्या निरोप समारंभात नेमकं काय घडलं? VIDEO

राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना विधान परिषदेमध्ये मात्र वेगळं चित्र पहायला मिळालं. नेहमीच्या प्रखर टीकेच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमधला कौतुकाचा वर्षाव शितलता देऊन गेला. आमदारांच्या निरोप समारंभात नेमकं काय घडलं ?पाहूया एक खास रिपोर्ट...

Bharat Mohalkar

शुभेच्छा, चिमटे आणि 'साहेब'

एरव्ही एकमेकांना नमस्कारही न करणारे....

समोरासमोर आल्यानंतर एकमेकांकडे न पाहणारे....

आणि भाषणात एकमेकांवर प्रहार करणारे....

पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंविषयी भरभरुन बोलले...नुसतेच बोलले नाहीत तब्बल साडेतीन वर्षांनी ठाकरेंचा पहिल्यांदाच 'साहेब' असा उल्लेख केलाय.

होय... याला कारण ठरलंय... उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या निरोप समारंभाचं भाषण... याच भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या...

दुसरीकडे एकमेकांवर टोकाची टीका करणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विधानपरिषदेत आमनेसामने आले.. आणि या दोघांनीही आपल्या खुमासदार शैलीत कौतुक करत एकमेकांना चिमटे काढलेत.

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, वि. स. पागे, मृणाल गोरे अशा सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. राजकारणातही तत्वे पाळली जायची. अनेकदा प्रचारात कठोर आणि टोकाची टीका केली जाते.. मात्र त्यानंतरही राजकीय वैरभाव विसरुन नेतेमंडळी एकत्र यायची. कटूता नसायची. विधान परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांचं कौतूक केलं.. त्यामुळे हिच सुसंस्कृत राजकारणाची परंपरा टिकवून ठेवण्याची गरज आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT