Covid 1 SAAM TV
महाराष्ट्र

JN1 variant: नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट हातपाय पसरतोय, पुण्यात सर्वाधिक रुग्ण

JN1 variant in Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना नवा व्हेरिएंट जेएन. १ चे १९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात नव्या कोरोना व्हेरिएंट रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे.

Vishal Gangurde

jn 1 covid:

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट फोफावत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन. १ चे १९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात नव्या कोरोना व्हेरिएंट रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. तर या व्हेरिएंटचे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांत देशातही कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागले आहेत. (Latest Marathi News)

नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या नवा व्हेरिएंटपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. देशात आतापर्यंत एकूण ४,५०,१२,४८४ जणांना कोरोना झाला होऊन गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, त्यातील कोरोनाच्या एकूण ५५,३३, ३५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कोरोना रुग्ण गेल्या काही वर्षात बरे झाले आहेत. याचदरम्यान, ३० डिसेंबरला ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जेएन. १ व्हेरिएंटचा धोका कमी आहे. तत्पूर्वी, गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ७९७ रुग्ण आढळून आले आहेत. १९ मेनंतर देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. १९ मे रोजी ८६५ रोजी कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

तज्ज्ञांनी लोकांना केलं सावध

देशात जेएन.१ रुग्णांची वाढू लागली आहे. जेएन. १ व्हेरिएंटच्या रुग्णांना सर्दीची साधारण लक्षणे दिसून येतात. तसेच श्वास घ्यायलाही त्रास होतो. मात्र, या व्हेरिएंटचा धोका कमी आहे. या व्हेरिएंटपासून सावध राहणं गरजेचं आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ्जांनी गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि चेहऱ्यावर मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

जेएन. व्हेरिएंटच्या रुग्णांची लक्षणे काय?

जेएन. व्हेरिएंटची सर्दी, घसा खवखवणे, कोरडा खोकला ही मुख्य लक्षणे आहेत. तसेच डोकेदुखी, अतिसार ही देखील लक्षणे दिसून आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT