Chhattisgarh: ७ वर्षांपूर्वी रुग्णाचा मृत्यू, ४ डॉक्टरांना आता झाली अटक, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Chhattisgarh Crime News in Marathi: छत्तीसगडमधून एक वेगळं प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडच्या ४ डॉक्टरांना ७ वर्षांपूर्वी झालेल्या कथित निष्काळजीपणाबद्दल अटक करण्यात आली आहे.
doctor, Yavatmal latest Marathi news, lohara police charged case on 7 doctors
doctor, Yavatmal latest Marathi news, lohara police charged case on 7 doctorssaam tv
Published On

chhattisgarh crime news:

छत्तीसगडमधून एक वेगळं प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडच्या ४ डॉक्टरांना ७ वर्षांपूर्वी झालेल्या कथित निष्काळजीपणाबद्दल अटक करण्यात आली आहे. कथित निष्काळजीपणा केल्याने २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ४ डॉक्टरांवर होता. पोलिसांनी शुक्रवारी डॉक्टरांना अटक केली. त्यानंतर वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, २५ डिसेंबर २०१६ साली गुरबीन नावाच्या युवकाला अपोलो रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच या तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना शरीरात विष असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालात युवकाच्या मृत्यूचं कारण समोर आलं नव्हतं. पुढे २०१९ साली एफएसएल रिपोर्टमध्ये युवकाच्या शरीरात विष आढळून न आल्याचे समोर आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

doctor, Yavatmal latest Marathi news, lohara police charged case on 7 doctors
Thane Crime News : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, जवळपास 100 तरुण ताब्यात; पार्टीत नेमकं काय सुरु होतं?

कुटुंबाचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

युवकाच्या कुटुंबाने २०१९ साली राज्य सरकार, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अपोलो रुग्णालयाविरोधात छत्तीसगड कोर्टात एक रिट याचिका दाखल करण्यात आली. डॉक्टरांच्या चुकीच्या औषध आणि उपचारामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला.

कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतरही पोलिसांकडून कारवाई झाली नाही. त्यानंतर २०२२ मध्ये हायकोर्टाचा अवमान केल्याचा मुद्दा समोर आला. त्यानंतर या प्रकरणी पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल करण्यात आली.

doctor, Yavatmal latest Marathi news, lohara police charged case on 7 doctors
Ulhasnagar Crime News : मित्रानेच केला घात, उल्हासनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

कोर्टात नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना १४ सप्टेंबर रोजी विशेष तज्ज्ञांना रिपोर्ट दाखल करण्यासाठी सांगितलं. रिपोर्ट दाखल न झाल्याने पुढील सुनावणीत मुख्य सचिवांना हजर राहण्यास सांगितलं.

पुढे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सरकंडा पोलिसांनी युवकावर उपचार करताना निष्काळजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत डॉक्टरांच्या विरोधात आयपीसी कलम ३०४ अंतर्गत एफआयर दाखल केला आहे. त्यानंतर शुक्रवारी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com