Sunetra Pawar Gungi Gudiya controversy साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडीया' उल्लेख; काँग्रेसच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात राजकारण तापले

Sunetra Pawar, Maharashtra Congress : बीडमधील पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या 'गुंगी गुडीया' या उल्लेखावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महायुतीने तीव्र आक्षेप घेत माफीची मागणी केली असून अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar Gungi Gudiya controversy : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा मोठा भडका उडाला आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेचा संदर्भ देत महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडीया' असा केल्याने सत्ताधारी महायुतीने यावर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया (X / ट्विटर) अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना "सुनेत्रा पवार, अजून किती दिवस 'गुंगी गुडीया' बनून राहतील?" असा सवाल करण्यात आला आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने ही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या या टीकेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी काँग्रेसने याबद्दल तात्काळ माफी मागावी आणि ते पोस्ट मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देऊन झाल्यानंतर वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्यामुळे त्यांनी बोलणे थांबवले होते; मात्र काँग्रेसने त्या व्हिडिओचा विपर्यास करून टीका केली आहे.

नेमका कोणता व्हिडीओ अन् काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र काँग्रेसकडून सोशल मीडियावर बीडमधील एका पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवताना दिसत असल्याचा दावा केला गेला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांचा थेट 'गुंगी गुडीया' असा उल्लेख केला. काँग्रेसच्या या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकरण तापले आहे.

अमोल मिटकरी आक्रमक; काँग्रेसला सुनावले बोल!

काँग्रेसच्या या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. साम टीव्हीशी बोलताना मिटकरी यांनी काँग्रेसने केलेल्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "काँग्रेसने महिला उपमुख्यमंत्र्यांचा असा अपमान करणे अत्यंत चुकीचे आहे. या वक्तव्याबद्दल काँग्रेसने तात्काळ माफी मागितली पाहिजे," अशी जोरदार मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

सोनिया गांधी अन् इंदिरा गांधींची करून दिली आठवण!

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमोल मिटकरी यांनी काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांची उदाहरणे देऊन त्यांना महिला सशक्तीकरणाची आठवण करून दिली. मिटकरी म्हणाले की, "ज्या पक्षाने देशात इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या महिला नेतृत्वाचा आदर केला, त्याच काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील एका महिला उपमुख्यमंत्र्याबाबत अशा प्रकारची हीन पातळीवरील भाषा वापरली जाणे दुर्दैवी आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT