Congress MP Prashant Padole’s shocking statement threatening PM Modi and CM sparks political uproar in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

PM, CM ला उडवून देऊ; महाराष्ट्रातील खासदाराची थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांना धमकी

Congress MP Prashant Padole Warn PM CM: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना उडवून देण्याची धमकी दिली आहे. सरकारने धोरणे बदलायला पाहिजे. शेतकऱ्यांना एक लाख रुपये भरपाई देण्याची मागणी त्यांनी केलीय.

Bharat Jadhav

  • भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने झोडपून काढलं.

  • जिल्ह्यातील धान पिकाचे मोठं नुकसान झालंय.

  • शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त १८ रुपये मिळत असल्याचा आरोप

शुभम देशमुख, साम प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या आंदोलनात आमदार, खासदारांना कापा अशी भाषा केली गेली. आता महाराष्ट्रातील कॉग्रेसच्या एका खासदारानं थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची धमकी दिलीय, अशा कापा कापी आणि उडवून देण्याची भाषा नेत्यांकडून होत असल्याने सुसंस्कृत महाराष्ट्राचा विसर पडलाय का? असा प्रश्न केला जातोय.

शेतकरी आंदोलनाआधी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत खुद्द बच्चू कडूंनीही शेतकऱ्यांना गजब सल्ला दिला होता. एखाद्या आमदाराला कापून टाकलं तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचे काम नाही. आमदाराच्या घरसमोर कपडे काढून बसा असा, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता. आता भंडाऱ्यातील कॉग्रेस खासदारांने पुढचं टोक गाठलंय. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उडवून देण्याची धमकी दिलीय.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने झोडपून काढलं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धान पिकाचे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल. त्यामुळे देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त १८ रुपये मिळतात ही शोकांतिका आहे. शेतातील धानाला कोंब फुटलेली आहेत.

त्यामुळे सरकारने धोरणं बदलायला पाहिजे. जर धोरण बदलवली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर चक्क पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देईल, अशी धमकी यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्याचं आश्वसन दिलंय. सरकार शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर दिली. कर्जमाफी कशी करता येईल. त्याचे निकष कसे असतील. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर काढता येईल, याबाबत उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Wallet: सॅमसंगचं खास डिजिटल अपडेट! UPI व्यवहार अधिक वेगवान होणार, वॉलेट अ‍ॅपमध्ये दमदार फीचर्स

Maharashtra Live News Update: बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या मृतदेहावर ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?

Winter Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर उपाय, असा बनवा ऍव्होकॅडो आणि मध फेसपॅक

एक दिवस राज्य हातात द्या, नायकच्या अनिल कपूरसारखं काम करेल, पवारांचा आमदार असं का म्हणाला? VIDEO

SCROLL FOR NEXT