Maharashtra Politics  Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

Pune Congress News : पुण्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

Pune News : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप यांनी पदाचा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय वैयक्तिक कारणास्तव घेतल्याचे संजय जगताप यांनी म्हटले आहे. यामुळे पुण्यातील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.

माजी आमदार संजय जगताप यांनी राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे पाठवला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही त्यांनी राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे. या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे.

काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा संजय जगताप यांचा विचार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सासवड आणि जेजुरी येथील काही माजी काँग्रेस नगरसेवकांनी संजय जगताप यांची भेट घेतली होती. नगरसेवकांनी जगताप यांना भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. मोठ्या संस्थेने कार्यकर्तेही काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

२०२४ च्या विधानसभा निवडुणकीमध्ये काँग्रेसच्या संजय जगताप यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या विजय शिवतारे हे पुरंदर मतदारसंघात विजयी झाले होते. विजय शिवतारे यांच्याकडून संजय जगताप यांचा २४,१८८ मतांनी पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या संभाजी झेंडे हे संजय जगताप यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे म्हटले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना; पत्नी सुमित्रा म्हणाल्या, ही शेवटची लढाई|VIDEO

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

कुख्यात गुन्हेगाराची हॉटेलमध्ये हत्या, सपासप वार करत घेतला जीव, बीडमधील रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद

500 ग्राम जिलेबी खाल्ल्याने किती प्रमाणात ब्लड शुगर वाढतं?

Maharashtra Politics : राज्यात राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला बडा मोहरा; शिवसेनेची ताकद वाढणार

SCROLL FOR NEXT