Raigad Fort : रायगडावरील धनगर वस्तीला गड सोडण्याच्या नोटिसा, किल्ल्याला कालच मिळालाय वर्ल्ड हेरिटेज दर्जा

Raigad Fort News : काल स्वराजाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला. आज रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला गड सोडण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
Raigad Fort
Raigad Fortx
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष असणाऱ्या, मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या १२ किल्ल्यांना युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. काल युनेस्कोने यासंबंधित घोषणा केली. युनेस्कोने हेरिटेज दर्जा दिलेल्या १२ किल्ल्यांमध्ये स्वराजाची राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचा समावेश आहे.

काल (११ जुलै) रात्री युनेस्कोने रायगडला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आणि आज (१२ जुलै) रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रायगडावरील धनगर वस्तीतील लोकांना गडकिल्ला खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Raigad Fort
Jai Shivaji : जय शिवाजी! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, वाचा इतिहास| PHOTO

रायगड किल्ल्यावरील बाजारपेठेच्या मागील बाजूस आणि जगदीश्वर मंदिराच्या शेजारी या दोन ठिकाणी धनगर वस्ती आहे. यात साधारण २२ झोपडीवजा घरे आहेत. धनगर समाजाची ही लोक मागील सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावर वास्तव्याला आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना, पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे धनगर लोक उदरनिर्वाह करत आहेत.

Raigad Fort
Ind Vs End : लॉर्ड्सवर टीम इंडियाचा विजय पक्का, सामना जिंकून भारत मालिकेत आघाडी घेणार; फक्त...

मे महिन्यामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाने सर्व घरमालकांना वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 'आम्हाला घर नाहीये, गड सोडून कसं जाऊ? मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे... गड सोडला तर आम्ही उदरनिर्वाहासाठी काय करायचे?' असे अनेक प्रश्न धनगर समाजाच्या लोकांनी उपस्थित केले आहेत. या लोकांनी गड सोडण्यास नकार दिला आहे. धनगर समाजाच्या लोकांच्या बाजून स्थानिक आमदार, मंत्री भरत गोगावले आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर उभे राहिले आहेत.

Raigad Fort
Beed : भावाने ज्या ठिकाणी आयुष्य संपवलं, त्याच कड्यावरुन बहिणीने केला आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com