Maharashtra Co-operation Minister Babasaheb Patil faces backlash over his remark that farmers are “addicted to loan waivers.” saam tv
महाराष्ट्र

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Minister Babasaheb Patil Statement Over Loan Waiver: राज्याच्या सहकार मंत्र्यांनी थेट उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर ओरखडा ओढलाय. त्यावरुन राजकारण तापलंय. मात्र सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांबाबत कसं असंवेदनशील वक्तव्य केलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी “शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय” असं विधान केलं.

  • विरोधकांनी थेट 50 खोक्यांचा मुद्दा काढत बाबासाहेब पाटलांना लक्ष्य केलंय.

  • राजकीय वाद निर्माण झाला असून, पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याऐवजी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. निवडून येण्यासाठी आम्ही आश्वासनं देतो. ते पूर्ण करतोच असं नाही. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असं असंवेदनशील वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलंय.

खरंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अतिवृष्टीने झोडपून काढलेल्या मराठवाड्यातील लातूरच्या अहमदपूरचे त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचीही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरलाय..मात्र बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या जखमांवर ओरखडे ओढलेत. त्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. विरोधकांनी थेट 50 खोक्यांचा मुद्दा काढत बाबासाहेब पाटलांना लक्ष्य केलंय.

एकीकडे विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना कृषिमंत्री दत्ता भरणेंनी मात्र असंवेदनशील सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची पाठराखण केलीय. तर आपल्या वक्तव्यामुळं नवा वाद पेटल्यानं अखेर बाबासाहेब पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

कितीही दिलं तरी रडतात साले. ही शेतकऱ्यांबद्दलची मंत्र्यांची जुनीच मानसिकता. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी तर शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्यांची मालिकाच सुरु केली होती. आता अतिवृष्टीनं पिकं, शेती, शेतातली माती, घरदार, जनावरं सगळं काही वाहून गेलंय.

शेतकरी कोलमडून पडलाय. त्याला आधार देण्यासाठी आकडे फुगवून सरकारने 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं खरं...पण मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायच्या आतच मंत्री बरळायला लागलेत.

एकीकडे लाडक्या बहीणीसाठी सरकार वर्षाला 45 हजार कोटी देतंय. 86 हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग बनवणारं सरकार कर्जमाफीसाठी सरकारकडे 35 हजार 744 कोटींची कर्जमाफी देऊ शकत नाही. सरकार कर्जमाफी देत नसेल तर निदान मंत्र्यांची अशी असंवेदनशील वक्तव्य तरी नकोत. एकूणच भीक नको पण कुत्रं आवर, अशी अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Picnic Tourism: मुंबईपासून फक्त ५० किमीवर वसलाय सुंदर निसर्ग, मुलांसोबत पिकनिकसाठी बेस्ट स्पॉट

Diwali Dmart Shopping: डिमार्टमध्ये कोणत्या दिवशी स्वस्त सामान असते? ९९ टक्के लोकांना माहित नाही

Crime : पती बनला हैवान, रागाच्या भरात पत्नीला जिवंत जाळलं; माहेरी फोन करुन सांगितलं अन्...

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Sameer Wankhede: 'मला पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमकीचे मेसेज...' समीर वानखेडेंचा दावा

SCROLL FOR NEXT