अतिवृष्टीनं पिकं वाहून गेली, बळिराजा ही गेला... मराठवाड्याची हृदय पिळवटणारी वास्तविकता, ७८१ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा|VIDEO

Tragedy in Marathwada: सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीनंतर केवळ एका महिन्यात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून आतापर्यंतचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.

मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये सर्वत्र अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या कालावधीत विभागातील तब्बल ७४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. तसेच जानेवारीपासून आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात नांदेड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत प्रत्येकी १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नापिकी, दुष्काळ, अतिपावसामुळे होणारे नुकसान, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यातच यंदा अतिवृष्टीने मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे.

विशेषतः सप्टेंबर महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. हाताशी आलेली खरिपाची लाखो हेक्टरवरील पिके वाया गेली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे.

जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात ७०७शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यात अतिवृष्टीच्या कालावधीत म्हणजे सप्टेंबर महिन्यात यात आणखी ७४ आत्महत्यांची भर पडली आहे.

सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात १७ आणि धाराशिव जिल्ह्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात १५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ आणि लातूर जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com