संजय सुर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी
Nanded father son suicide due to crop loss and reservation issues : बाप-लेकाच्या आत्महत्येने नांदेड जिल्हा हादरला आहे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याने आय़ुष्याचा दोर कापण्याचा निर्णय घेतला. नांदेडमध्ये मुलगा गेल्याचं समजताच अवघ्या १२ तासात बापानेही प्राण सोडले. माझे सर्व पीक पाण्याखाली गेले आहे. माझ्या मुलाला कोणताही रोजगार नाही, आमच्या आरक्षणाच्या नोंदी सापडत नाहीत, असे म्हणत नांदेडमधील शेतकऱ्याने आय़ुष्याचा दोर कापला. त्याच्याआधी १२ तास मुलानेही जीव दिला होता. बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. पूर परिस्थिती व आरक्षण नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे.
(Nanded double suicide case father follows son within 12 hours)
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील दुख:द घटना घडली आहे. येथील शेतकरी निवृत्ती कदम यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे मुलाच्या आत्महत्येने वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी अवघ्या 12 तासात प्राण सोडले. पिक पाण्याखाली गेलं, मुलाला नोकरी नाही. आरक्षणाच्या नोंदी सापडत नाहीत, असा चिठ्ठीत उल्लेख करत कदम यांनी आयुष्य संपवलं. पोलिसांकडून चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हे नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध पित्याने ही घटना त्याच्या कानी पडताच अवघ्या 12 तासातच आपले प्राण सोडले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली. निवृती कदम आणि सखाराम कदम अस पिता पुत्राचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.