Eknath Shinde Speech in Assembly
VIDEO Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत ३ सिलिंडर, विरोधक गॅसवर; CM शिंदेंचं विधानसभेत तुफान भाषण

Ruchika Jadhav

सुनिल काळे, मुंबई

गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याचं म्हटलं जात आहे. मात्र काल आम्ही महिलांसाठी ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. ३ सिलिंडर मोफत दिल्याने काही विरोधीपक्ष चांगलेच गॅसवर आले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. काल अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत तुफान भाषण करत प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही बजेटमधून सर्व योजना दाखवून दिल्या आहेत. आम्ही महिलांसाठी मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. त्यावर काहींनी टीका करत लाडका भाऊ कुठे गेला असं विचारलं. तर लाडक्या भावाचं सुद्धा आम्ही नियोजन केलं. जे तरुण मुलं अद्यापही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी दरमहिन्याला आम्ही १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे.

लोकसभेत थोड्या जागा जास्त काय आल्या ते इतके फुगले. आता त्यांना वाटतंय विधानसभा तेच जिंकणार. पण काल विरोधकांची परिस्थिती सुतकासारखी झाली होती. त्यांचे चेहरे मी बघितले तेव्हा योजना ऐकून त्यांचा सुफडा साफ झाला होता, अशा शब्दांतही शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Water Benefits: भिजवलेल्या जिऱ्याचे पाणी प्या; झटपट वजन कमी करा

Sanjay Raut News: दिंडीला 20 हजार देऊन वारकरी खरेदी? राऊतांनी शिंदेवर केलेला नेमका आरोप काय?

Sawantwadi News: शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात शाळांची दुरावस्था; सावंतवाडी शाळेची भिंत कोसळली!

Dhule Crime : हॉटेलमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ICC Rankings: IPL मध्ये ट्रोल ते वर्ल्डकपचा हिरो! टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिकला ICC कडून मोठं गिफ्ट

SCROLL FOR NEXT