Maharashtra CM Call Meeting For Mahadevi Elephant saam tv
महाराष्ट्र

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

Maharashtra CM Call Meeting For Mahadevi Elephant: नांदणीची महादेवी हत्ती परत येण्याची शक्यता आहे. कारण आता खुद्द सरकारने या वादात उडी घेतलीय... सरकारने नेमका काय निर्णय घेतलाय? आणि खरंच महादेवी पुन्हा कोल्हापुरात परतणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • कोल्हापूरमध्ये हत्तीणी 'महादेवी'साठी जोरदार जनआंदोलन

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली

  • प्राणीप्रेमी आणि नागरिकांनी हत्तीणीच्या मुक्ततेची केली मागणी

  • सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता

हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे नांदणी गावातील नागरिकांचा. कोल्हापूरकरांच्या विरोधाला डावलून गुजरातमधील वनतारात नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्यभरात अनेकांनी सोशल मीडियाच्या आणि रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग स्विकारला.

त्यानंतर राज्य सरकारलाही नागरिकांच्या मागणीची दखल घ्यावी लागली. त्यामुळे आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार आहे. महादेवीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

दरम्यान महादेवी हत्तीणीला परत आण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत काय आदेश दिलेत पाहूयात.

'महादेवी'साठी सरकार सरसावलं

34 वर्षांपासून हत्तीण नांदणी मठात, हत्तीण परत आली पाहिजे अशी सर्वांची इच्छा

मठानं एक याचिका दाखल करावी, राज्य सरकारही एक याचिका दाखल करणार

राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत

हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक तयार करणार

रेस्क्यू सेंटर, आहाराबाबतही सरकार याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल

दुसरीकडे महादेवी हत्तीण परत नांदणीत येईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराच राजू शेट्टींनी दिलाय. दरम्यान कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणला परत आणण्यासाठी जनभावना तीव्र होतायेत. बीडमध्येही नागरिक आक्रमक झालेत. सेव्ह माधुरी, बायकॉट जिओ अशा आशयाची बॅनरबाजी ठिकठिकाणी करण्यात आलीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर स्थानिकांच्या संघर्षाला यश येऊन महादेवी पुन्हा थाटात कोल्हापुरात परतणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: चंद्रपूरमध्ये हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहूनी सुंदर ठिकाणं, एकदा भेट द्याच

Mumbai: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, शीर धडावेगळं झालं

Flat Maintenance : आता फ्लॅटच्या आकारानुसार मेटेनेन्स द्यावा लागणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Social Media Account Ban : सोशल मीडियातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; धुळ्यात तिघांवर गुन्हा

Mumbai News: दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरून तणाव; पोलिसांशी जैन समाजाची धक्काबुक्की|VIDEO

SCROLL FOR NEXT