Maharashtra CM announces full compensation for farmers after heavy rain damages crops saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Farmers : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

Bharat Jadhav

  • मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

  • पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

  • सरकारकडे शेतकऱ्यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली होती.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतातील पिके नष्ट झाली आहेत. मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटून पिके वाहून गेली आहेत. पिके नष्ट झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आलाय. सरकारनं त्वरीत आर्थिक मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली जातेय. (Maharashtra Farmers to Receive Government Compensation After Flood Destruction)

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. मुसळधार पावसाने थैमान घालत शेतातील पिके उद्धवस्त झाली होती. मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके अशी नष्ट झालेली पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंना बांध फुटलाय. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न केलाय.

पावसामुळे 14 लाख एकर जमीन वरील पीक नष्ट झाले आहे. पण चार दिवसांत मदत दिली जात नाही. मदत सर्व शेतकऱ्यांना दिले जाईल, पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल,असे मुख्यमंत्री म्हणालेत. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय.राज्यातील परिस्थती नियंत्रणात आलीय. मात्र अजून काही भागात पाऊस अजून चालू आहे.

आजही काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनकाकडून काळजी घेतली जात आहे. राही नद्या आहेत,त्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा देण्यात येत आहे, त्यांचे स्थलांतर केले जात आहे.तसेच त्याबाबत वेगवेगळ्या राज्याशी चर्चा केली जात आहे. तेही त्यांच्या राज्यातील धरणातील विसर्ग वाढवत आहेत.

पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधुंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवाबाबत प्रश्न केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीयकरण करु नये. मात्र ठाकरे बंधुंनी त्याचं राजकारण केलं.

शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलं नाही, असे फडणवीस म्हणालेत. दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत. आता ठाकरे ब्रँण्ड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं. पण हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाहीये, असेही मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT