Maharashtra Cabinet Portfolio Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; कुणाला कोणतं खातं, पाहा डिटेल्स

Maharashtra Cabinet: राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Priya More

Maharashtra Government:

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपासोबतच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फक्त वित्त व नियोजन हे खातं असणार आहे.

Maharashtra Cabinet Portfolio

इतर २६ मंत्र्यांची खाती खालीलप्रमाणे असणार आहेत....

- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

- दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

- हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

- चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

- विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

- गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

- दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

- संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

- धनंजय पंडितराव मुंडे - कृषि

- सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

- संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

- उदय रविंद्र सामंत- उद्योग

- तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

- रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

- अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

- दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

- अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

- शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

- अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

- संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

- मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

- अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT