Pune Crime News: कोयता, बांबू घेवून दहशत माजवणे पडले महागात; पोलिसांनी चांगलीच जिरवली... तीन "भाईंची" भर चौकातून काढली धिंड

Pune Police News Update: पोलिसही एक्शन मोडवर आले असून त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी विविध कारवाया करताना दिसत आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. याविरोधात आता पोलिसही एक्शन मोडवर आले असून त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी विविध कारवाया करताना दिसत आहेत.

काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची वरात मोहीम सुरू केली. या कारवाई अंतर्गत फरासखाना परिसरात पोलिसांनी खुनी हल्ला करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईची सध्या नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. (Crime News In Marathi)

Pune Crime News
Dhule News : विषारी साप खुुराड्यात घुसला, कोंबडीची ७ अंडी गिळली; सर्पमित्रानं मोठ्या हिंमतीनं वाचवलं

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी आरोपींनी पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वेदांत सारसेकर यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी कोयता, बांबू, काचेच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

यावरच न थांबता "आम्ही इथले भाई आहोत इथून पुढे आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर त्याला जिवंत सोडणार नाही" असं म्हणत या आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती. याप्रकरणी तपास करत ऋत्विक गायकवाड, उजेर शेख, अरमान शेख या तिन्ही आरोपींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

Pune Crime News
Sadabhau Khot On Suniel Shetty: सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा, भीक मागायला आला तर..., टोमॅटोवरील वक्तव्यानंतर सदाभाऊ खोतांनी घेतली शाळा

पोलिसांनी मुसक्या आवळताच या तीन "भाईंची" परिसरातून धिंड काढली. पुणे पोलिसांच्या (Pune Police) या कारवाईची सध्या शहरात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्याभरापासून ही धडक कारवाई सुरु केली आहे. पुण्यात वाहनांची तोडफोड करुन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com