Sadabhau Khot On Suniel Shetty: सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा, भीक मागायला आला तर..., टोमॅटोवरील वक्तव्यानंतर सदाभाऊ खोतांनी घेतली शाळा

Tomato Price Hike Controversy: 'सुनील शेट्टी हा आर्थिकदृष्ट्या गंबरसिंग आहे. तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही.', असे सदाभाऊ खोतांनी सांगितले.
Sadabhau Khot On Suniel Shetty
Sadabhau Khot On Suniel ShettySaam Tv
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News: बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीने (Bollywood Actor Suniel Shetty) महागलेल्या टोमॅटोच्या (Tomato Price Hike) मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. 'मी टोमॅटो खाणे कमी केलं आहे.', असे वक्तव्य त्याने केले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) सुनील शेट्टीला ट्रोल केले जात आहे.

तर दुसरीकडे सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावरुन क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सुनील शेट्टीची शाळा घेतली आहे. 'सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा आहे. भीक मागायला आला तर त्याच्या कटोऱ्यात सडके टोमॅटो टाका.', अशी टीका त्यांनी केली आहे.

Sadabhau Khot On Suniel Shetty
Tomato Effect On Bollywood Celebrity: टॉमेटो महागल्यानं सेलिब्रिटींचंही बजेट कोलमडलं, सुनिल शेट्टीसह ‘या’ अभिनेत्याला बसला फटका

सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सुनील शेट्टीवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'देशामध्ये आणि राज्यामध्ये टोमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वच लोकं टोमॅटो टोमॅटो करत पागल झाले आहेत. या पागलांमध्ये भर पडली ती म्हणजे सिनेकलावंताची. सिनेकलावंत हे संवेदनशील असतात. सामान्य माणसांची दु:ख वेशीला टागणारी माणसं म्हणजे सिनेकलावंत. पण काही सिनेकलावंत सडक्या डोक्याची आहेत. सुनील शेट्टी हा आर्थिकदृष्ट्या गंबरसिंग आहे. तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही.'

Sadabhau Khot On Suniel Shetty
Supreme Court Assembly Speaker Notice: १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

तसंच, 'हे सिनेकलावंत शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यवधी रुपये घेतात. तोच शेतकरी एकाबाजूला आत्महत्या करतोय. कधी तरी दहा -बारा वर्षांतून त्याला चांगाल भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागते. सुनील शेट्टी तुम्ही सिनेकलावंत नाही तर तुम्ही बाजारू कलावंत आहेत.', अशा शब्दात त्यांनी सुनील शेट्टीची शाळा घेतली आहे.

Sadabhau Khot On Suniel Shetty
Mumbai Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 29 टक्के पाणीसाठा, मागच्या वर्षीच्या तुलनेत आहे निम्मा

त्यांनी पुढे सांगितले की, 'मी राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की, सुनील शेट्टी हा जागतिक भिकारी आहे. हा भिकारी जर तुमच्या दारात कटोरा घेऊन भिक मागायला आला. तर या सडक्या डोक्याच्या माणसाच्या कटोऱ्यामध्ये सडकी टोमॅटो टाका आणि या जागतिक भिकाऱ्याची भूक भागवा.' तसंच, 'हे सिनेकलावंत दारु गुटखा आणि सिगारेट ओढायला जेवढा पैसा खर्च करतात. त्यामधील काही भाग जर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या घरात आला तर शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्वल होईल. याचा तुम्ही कधीतरी विचार करता का?', असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com