shinde government news  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: सत्तासंघर्षाचा निकाल १० दिवसात येण्याची शक्यता; मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Cabinet Expansion News: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे.

Shivaji Kale

New Delhi: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे. या सर्वाोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू जेष्ठ वकील निरज किशन कौल आणि जेष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहे. तर ठाकरे गटाची बाजू जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल पुढील १० दिवसात येणार असल्याची शक्यता आहे.

...म्हणून राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे राज्यमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 10 दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याने साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं यावर राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. त्यानंतरच होणार मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान आगामी पालिकेच्या निवडणूका लागल्यास ठाकरे गटाला यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीला कशी तयारी करतील, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ शिंदे यांनी टीप्पणी केली होती. 'सरकार स्थापन होवून सात महिने झाले. मात्र या कालावधीनंतर मंत्री मंडळ विस्तार झाला नाही. एकदा मंत्री मंडळाचा विस्तार झाला की आपोआप असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून मंत्रि

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

SCROLL FOR NEXT