Maharashtra Cabinet Expansion Latest News Saam TV Marathi
महाराष्ट्र

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

Devendra Fadnavis cabinet expansion Update: केंद्रीय मंत्रिमंडळानंतर देवेंद्र फडणवीस सरकारचाही विस्तार अथवा खांदेपालट होण्याची शक्यता आहे. कुणाचा पत्ता कट होणार? कुणाला संधी मिळणार? हे लवकरच स्पष्ट होणार

Namdeo Kumbhar

Maharashtra Cabinet Expansion latest Update : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या आगामी विस्तारात सुमार कामगिरी करणारे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांची उचलबांगडी केली जाऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार हे आपापल्या अधिकारात पक्षातील मंत्र्यांबाबत हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्या मंत्र्यांमुळे महायुतीला गालबोट लागले होते, त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आली होती; मात्र आता थेट त्यांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.

तिन्ही पक्षांच्या खात्यांमध्ये फेरबदल होणार?

या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ मंत्रिपद जाण्याचीच भीती नाही, तर काही बड्या मंत्र्यांची खातीही बदलली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि अजित पवार गट या दोन्ही पक्षांतील काही मंत्र्यांकडील खात्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. शिवसेनेच्या कोट्यातील अकार्यक्षम आणि वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील या मोठ्या खांदेपालटाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीला डाग लावणाऱ्या कोणत्या नेत्यांची हकालपट्टी होणार आणि कोणाची खाती बदलणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. या संभाव्य विस्तारामुळे सध्या राज्यातील अनेक मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Maharashtra News Live Update: कोकणात दुष्काळाच्या झळा; पावसाअभावी भातशेती संकटात, पंपाने पाणी देत शेतकऱ्याची शेती वाचवण्याची धडपड

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

SCROLL FOR NEXT