chhagan bhujbal dilip walse patil 
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion : अजितदादांचं धक्कातंत्र, ४ दिग्गजांना डच्चू, भुजबळ नाराज, मेळाव्याला गैरहजर

chhagan bhujbal dilip walse patil : छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार नाही, हे आता जवळपास निश्चित झालेय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीसाठी अद्याप फोन गेलेला नाही. भुजबळ नाराज असल्याचेही बोलले जात आहे. पक्षाचा मेळावा सुरू असताना भुजबळ मात्र हॉटेलमध्येच मुक्कामी आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. अजित पवार यांनी चार दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या चार आमदारांना फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटल्याला १० खाती आलेली आहेत. आज ९ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये या चार आमदारांना फोन गेला नाही. छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

कोण कोणत्या ४ नेत्यांना डच्चू -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ नेत्यांना अजित पवार यांनी यावेळी मंत्रिमंडळता स्थान दिलेले नाही. शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळात असणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्रम आणि संजय बनसोडे यांना फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रि‍पदे आलेली आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतली. आज ९ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. त्यांची यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये भुजबळ आणि वळसे पाटील या दिग्गजांचा समावेश नाही.

छगन भुजबळ नाराज?

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहे. आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होत आहे. अजित पवार नागपूरमध्ये आल्यानंतर छगन भुजबळ त्यांच्या स्वागतालाही गेले नाहीत. त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू असताना छगन भुजबळ हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीस सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणार?

अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय

धनंजय मुंडे

अदिती तटकरे

हसन मुश्रीफ

दत्ता भरणे

नरहरी झिरवळ

मकरंद आबा पाटील

इंद्रनील नाईक

⁠माणिकराव कोकाटे

बाबासाहेब पाटील

शिवसेनेत कुणाला मंत्रिपद?

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, नगरविकास

उदय सामंत

संजय शिरसाट

शंभुराजे देसाई

दादा भुसे

गुलाबराव पाटील

भरत गोगावले

प्रताप सरनाईक

संजय राठोड

योगेश कदम

आशिष जैस्वाल

प्रकाश अबिटकर

भाजपमधून कोण कोण मंत्रिमंडळात?

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, गृहमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे

नितेश राणे

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

पंकज भोयर

मंगलप्रभात लोढा

गिरीश महाजन

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

मेघना बोर्डीकर

माधुरी मिसाळ

अतुल सावे

आकाश फुंडकर

अशोक उईके

जयकुमार मोरे

संजय सावकारे

आशिष शेलार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT