Cabinet Decision Maharashtra News Update Saam Tv News
महाराष्ट्र

Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे ९ महत्त्वाचे निर्णय, फडणवीस सरकारने कोणत्या जिल्ह्याला काय दिलं?

Cabinet Decision Maharashtra : राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत झोपडपट्टी सुधारणा, रेती धोरण, म्हाडा पुनर्विकास, नागपूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन संस्था यांसारखे ९ महत्त्वाचे निर्णय जाहीर. जिल्हानिहाय काय मिळालं, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Cabinet Decision Maharashtra News Update : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत झोपडपट्टी सुधारणा, रेती धोरण, म्हाडा पुनर्विकास, नागपूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन संस्था यांसारखे ९ महत्त्वाचे निर्णय जाहीर.

मंत्रिमंडळ निर्णय

1) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार

(नगर विकास)

2) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर

(महसूल)

3) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार

(गृहनिर्माण)

4) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय

(गृहनिर्माण)

5) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025

(महसूल)

6) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार

(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)

7) खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची 'सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा निर्णय

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

8) शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

9) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा

(ग्रामविकास)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT