Cabinet ministers of Maharashtra 
महाराष्ट्र

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

MAHARASHTRA CABINET TAKES 8 BIG DECISIONS : मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'उमेद मॉल', पंचायतराज पुरस्कार, विशेष न्यायालये, धरण दुरुस्ती यांसह ८ मोठे निर्णय घेण्यात आले. ग्रामीण महिलांना व्यवसायाची नवी दिशा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra government's Umed Malls for rural SHGs : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेलाही झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, १० जिल्ह्यात 'उमेद मॉल', ‘ई-नाम’, विशेष न्यायालय स्थापन यासह वर्धा, पिंपरी चिंचवडसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेली मंत्रिमंडळाची बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोजकेच नेते उपस्थित होते.

मंत्रिमंडळाची बैठक वादळी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांनी ५ मंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपाबाबत चर्चा झाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावरही चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले. तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं म्हणत तुम्हाला किती वेळा माफ करायचं? अशी नाराजी व्यक्त केली. पाहूयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले?

• राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग)

• ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार. (ग्राम विकास विभाग)

•‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार व पणन विभाग)

• महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार. (विधि व न्याय विभाग)

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी. (विधि व न्याय विभाग)

•वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

• वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी ) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

•महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता. (महसूल विभाग )

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT