Metro Expansion, Ring Roads, and Coastal Connectivity in Maharashtra x
महाराष्ट्र

विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

Metro Expansion, Ring Roads, and Coastal Connectivity in Maharashtra: उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवण बंदरापर्यंत वाढवण्यास मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय.

Bhagyashree Kamble

  • उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवण बंदरापर्यंत वाढवण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता.

  • नाशिक कुंभमेळ्यासाठी 66 किमी आंतर रिंग रोड उभारणीला मंजुरी.

  • पुण्यात मेट्रोच्या विविध कॉरिडॉरचे काम 2027-2029 दरम्यान पूर्ण होणार.

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही रोड आणि लिंक रोडवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्यानं वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तन - विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवण बंदरापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाची एकूण लांबी ५५.१२ किमी असणार आहे. त्यातील मुख्य सागरी सेतू २४.३५ किमी लांबीचा असेल. या प्रकल्पात ९.३२ किमीचा उत्तन जोडरस्ता, २.५ किमीचा वसई जोडरस्ता आणि १८.९५ किमीचा विरार जोडरस्ता केला जाणार आहे. आता या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय़ घेण्यात आला आहे. या सेतूचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे'.

'मुंबईतील उत्तर दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. यासह दक्षिण किनारी रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू, अटल सेतू, आरेंज गेट बोगदा, वर्सोवा वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग आणि शिवडी वरळी उन्नत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प राबविण्याचेही नियोजन असून, या प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे', असं फडणवीस म्हणाले.

नाशिक रिंग रोडला मंजुरी

नाशिक कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोड आणि आंतर रिंग रोड उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. या रिंग रोडमुळे सातही मार्गांवरून येणाऱ्या भाविकांची वाहतूक अधिक सुलभ होईल. एकूण ६६ किमी लांबीचा आंतर रिंग रोड उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पाची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुण्यातील मेट्रोच्या ६ कोच गाड्या, यासह विविध कॉरिडॉर पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासह,

  • पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी (४.४ किमी) ही एलिव्हेटेट मेट्रो जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होईल.

  • स्वारगेट ते कात्रज अंडरग्राऊंड मेट्रो मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.

  • वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हे कॉरिडॉर जुलै २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

  • हडपसर स्वारगेच खडकवासला मेट्रो प्रकल्पासाठी तात्काळ भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश.

पुरंदर विमानतळासाठी रस्ता आणि मेट्रो सुविधा

हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर विमानतळापर्यंत नेण्यात येणार आहे. पुरंदर एअरपोर्टकडे जाण्यासाठी रस्ते, मेट्रो आणि मल्टीलेव्हल पार्किंग सुविधा उभारण्यात येणार असून, या सर्व कामांचे इंटेग्रेटेड नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT