Maharashtra cabinet  saam tv
महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ४ धडाडीचे निर्णय

Maharashtra cabinet latest decisions 2026 : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्यास मंजुरी दिली. यासह शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ आणि नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Namdeo Kumbhar

Maharashtra cabinet decisions today : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६ मे २०२६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. मधु दंडवते यांच्या स्मृतींना उजाळा देत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परिवहन, सामान्य प्रशासन, उद्योग आणि महसूल विभागाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील बदल्यांना कायदेशीर सुधारणेद्वारे मुदतवाढ देण्यात आली.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग)

शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता. (उद्योग विभाग)

नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'कंत्राटातील 56 % आमदार, अधिकाऱ्यांना', ठेकेदारांच्या अधिवेशनात धक्कादायक आरोप

नवऱ्यासोबत ठरली शेवटची ट्रिप; इंजिनीअर महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, ७ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबलं, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

महाराष्ट्रावर महादुष्काळाचं संकट, राज्यात 31 ऑगस्टपर्यंतच पाणीसाठा, शेतीसाठी पाणी पुरवठा बंद

शिंदे-नाईंकांमध्ये पुन्हा मानापमान नाट्य, शिदेंना डावललं, नाईकांची गाडी अडवली

SCROLL FOR NEXT