MAHARASHTRA APPROVES NAGPUR METRO PHASE-2 EXTENSION AND MUMBAI BANDRA FORT CONNECTOR PROJECT Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Infrastructure : प्रवास होणार सुसाट! नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला हिरवा कंदील

Maharashtra Infrastructure : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तार आणि मुंबईतील सावरकर सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

  • सावरकर सागरी सेतू ते वांद्रे किल्ला कनेक्टरसाठी १,७२२.४० कोटी रुपये

  • नागपूर मेट्रो टप्पा-२ अंतर्गत कन्हान शहरापर्यंत मेट्रो मार्गिकेला हिरवा कंदील

  • मुंबईतील प्रवास वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता हे.

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर आणि मुंबईतील दोन मोठ्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी, तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूला वांद्रे किल्ल्याशी जोडणाऱ्या कनेक्टर प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत सुमारे ३.५५ किलोमीटर लांबीचा अतिरिक्त जोडरस्ता उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १,७२२.४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कनेक्टरमुळे सध्या २० ते ४५ मिनिटे लागणारा प्रवास अवघ्या १० मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान १.४० किलोमीटर लांबीची उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेवर एक मेट्रो स्थानक प्रस्तावित असून प्रकल्पाची एकूण किंमत ३१०.३५ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) मार्फत केली जाणार आहे.

दरम्यान, या मेट्रो विस्तार प्रकल्पाला केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

SCROLL FOR NEXT