Disha Salian's Death Case Update: Written Order By Government To Form Form SIT in Disha Salian's Death Case  Saam Tv
महाराष्ट्र

Disha Salian Case: मोठी बातमी! दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज SIT स्थापन होणार; आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

Disha Salian's death Case Update: दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

SIT on Disha Salian Death Case:

दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी (SIT) स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून या संबंधीचे लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अभिनेत्री दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारकडून SIT चौकशी करणार आहे. याबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार, १२ डिसेंबर) राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या चौकशीचीही मागणी केली होती. त्यामुळे आता या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तसेच कालच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी "आम्ही जर तुमच्या एस आय ट्या लावल्या तर तुम्हांला खूप अडचण होईल..." असे विधान केले होते.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

मालाडमधील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT