मुक्ताई नगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि आमदार चंद्रकांत पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गाडीचा आज किरकोळ अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये फिरत असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील दोन गाड्यांची धडक होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पोलीस व्हॅनसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या गडबडीमुळे प्रत्येक नेत्यांनी गावभेटी, दौऱ्यांचा धडाका लावला आहे. या धावपळीत अपघातांच्या बातम्याही समोर येत आहेत. मागच्याच आठवड्यात केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. साताऱ्याहून मुंबईकडे जाताना हा अपघात झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.