संध्याकाळी साडेपाच वाजता दापोली पोलीस स्टेशनमध्ये आलेले किरीट सोमय्या तीन तासापासून पोलीस स्टेशन च्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत आहेत.अनधिकृत बांधकाम करणाऱ्या साई रिसॉर्टची उभारणी करणाऱ्या मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सोमय्या यांनी दिलाय.दरम्यान दापोली पोलीस स्टेशन बाहेर भाजप कार्यकर्ते बसून आहेत तर पोलिसांकडून या आंदोलनावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
* किरीट सोमय्या, वकील संदेश चिकणे, निलेश राणे, एस पी मोहित गर्ग यांच्यात चर्चा सुरू...
* किरीट सोमय्या आत जाऊन चर्चा करून येतात चर्चा होतेय...काय चर्चा होतेय हे विचारले असता कुठलीही चर्चा होत नाही...
* मग चहा पिऊन आतून आलात असे विचारले असता किरीट सोमय्या यांनी चहा पिलो पण फोनवर उद्धव ठाकरे यांचा असे उत्तर दिले...
* पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन सुरू....
* किरीट सोमय्या यांचे धरणे आंदोलन...
* किरीट सोमय्या, निल सोमय्या भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन...
* माझ्या सोबत घातपात होण्याची शक्यता..
* पोलिस शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.
* किरीट सोमय्या यांचा आरोप...
* कार्यकर्त्यांना पुन्हा पोलीस स्टेशन आवारात आणत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही..
* एसपी कोणाचा आदेशाने काम करत आहेत....
* किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांची पोलिसांशी चर्चा सुरू असतांना निलेश राणे यांनी वकील मागवून घेतला आहे...
* वकील पोलिसांशी चर्चा करत आहेत...
* नोटीस देऊन ही आपण इथपर्यंत आलात
* तुम्ही साई रिसॉर्ट वर जाण्याची तयारी कराल तर मला तुम्हाला ताब्यात घ्यावे लागेल...
* किरीट सोमय्या, निलेश राणे यांनी नोटीस का स्वीकारली नाही याचा जाब लिहून घेतला जात आहे....
* किरीट सोमय्या यांच्याकडून जाब लिहून घेतला जात असतांना किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या फोन वर आपल्या वकिलांशी कायदेशीर चर्चा करत आहेत...
* पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्याय घेण्याची शक्यता...
* किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असल्याने थोड्या वेळासाठी ताब्यात घेत पोलीस सुरक्षेत मुंबईकडे रवना केले जाणार असल्याची माहिती...
* किरीट सोमय्यांनी दापोली पोलीस बाहेर ठाण मांडली आहे...
रत्नागिरीत आम्हाला थांबवण्याचं ठाकरेंच्या बापालाही जमले नाही. निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले आहे. आज जर गडबड झाली तर आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाही.
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया असे ट्विट केले होते. आज सोमय्या सकाळीच प्रतिकात्मक हातोड घेवून दापोलीकडे निघाले आहेत. त्यावर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची प्रतिक्रिया आली आहे. हा रिसॉर्ट माझा नाही. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पालिकेचे नोकर आहेत. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब म्हणाले.
* निलेश राणे यांना दापोली पोलिसांकडून 149 ची नोटीस..
* निलेश राणे- अश्या नोटीसीना मी घाबरत नाही
(दीपक क्षीरसागर)
लातूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास पाच महिन्यापासून शासकीय सेवेत समावून घ्यावे, या न्याय मागणीसाठी संप सुरू आहे. या संपाला २५१ दिवस होत आहेत. या १५१ दिवसात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला अजूनही न्याय मिळाला नाही. एसटी महामंडळाने बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागो होण्यासाठी संधी दिली आहे. त्यानुसार १० बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांनी संवेत समावून घेण्यासाठी अर्ज केले आहेत.
(डाॅ. माधव सावरगावे)
औरंगाबाद- राजू शेट्टी महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्याची शक्यता
5 एप्रिल रोजीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच
विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत आमदार व्हायचं की नाही हेही पाच तारखेला ठरवणार
भविष्यात आघाडीचं राजकारण करायचं की नाही याचा गंभीर विचार करणार
येत्या पाच तारखेला राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय घेणार
राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण....
(अमोल कलये)
रत्नागिरी - किरीट सोमय्या यांच्या दापोली दौ-यामुळे दापोलीला छावणीचं स्वरुप
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसाँर्टवर कारवाईची सोमय्यांची मागणी
प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दापोलील मोठा पोलीस बंदोबस्त
पोलीस अधिक्षक मोहीत कुमार गर्ग यांची अधिका-यांसोबत महत्वाची बैठक सुरु
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांना पोलिसांची नोटीस
सोमय्यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा मोडल्यास कारवाईचा इशारा
(प्राची कुलकर्णी)
पुणे - एसटीचा प्रश्न सुटलेला आहे३१ मार्च पर्यंत जे येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला
- अनिल परबांनी समंजस भुमिका घेतली- सातव्या वेगळं आयोगाच्या जवळपास पगारवाढ केलेली आहे - आता त्यांना शेवटची संधी आहे, असे पवार म्हणाले
एसटी कामगारांना विनंती- परीक्षा सुरु आहेत. एसटीची गरज आहे. काहींना निलंबित केलं आहे - ३१ मार्च पर्यंत कोणाचंही न ऐकता- आत्महत्या न करता पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.