Marathi News Live - Saam Tv
महाराष्ट्र

दिवसभरातील अपडेट एका क्लिकवरती!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात कोरोनाचे 675 रुग्ण, 5 मृत्यू

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 100 कोटी कथित वसुली प्रकरणात सीबीआय देशमुखांचा जवाब नोंदविणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सीबीआयच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये तीन दिवस सीबीआयतर्फे जवाब नोंदविला जाणार आहे. मार्च 3,4, आणि 5 या तारखेला सीबीआय अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार आहे. यापूर्वी सीबीआयने सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचा जवाब नोंदविला आहे.

राज ठाकरे शाखांना अन् मंत्र्यांना देणार नवी पाटी, "कारभार ऐसे करवा की...''

मुंबई: आज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. घाटकोपरला शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे आज प्रभादेवीला उपस्थीत होते. तिथे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आज काही भाषण करणार नाही. व्यासपीठावर तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. कारण खालून दर्शन होत नाही. निवडणूक कधीही लागतील, अजून तरी या वातावरणात निवडणूक वाटत नही. लागल्यावर सगळ्यांची पाक पाक सुरु होईल, तेव्हा आमचीही सुरू होईल.

मी सभा घेणार आहे तेव्हा इथेही सभा घेईन. ही शाखा आहे, दुकान नव्हे, इथं आल्यावर न्याय मिळायला हवा. यावेळी राज ठाकरेंनी एका नव्या पाटीची घोषणा केली आहे. एक पाटी मी सगळ्या शाखेला देणार आहे. तीच पाटी प्रत्येक मंत्र्याला पाठवणार आणि ती लावायला सांगणार आहे. शिव छत्रपतींचा संदेश आहे, मंत्रालयातल्या सगळ्या भागात पाठवणार आहे. "कारभार ऐसे करवा की रयतेच्या भाजीच्या डेठालाही हात लागू नये" या संदेशाचा प्रत्येक जण तंतो-तंत पालन करेल अशी अपेक्षा राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली आहे.

अँटिलिया स्फोटकं प्रकरणी रियाज काजीचा जामीन फेटाळला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अटकेत असलेला रियाज काजी याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आणि माजी पोलीस अधिकारी आहेत रियाझ काझी.

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई: भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक असल्याचा आरोप आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. सदर प्रकरणी नील सोमय्यांना अटक होऊ शकते म्हणून सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांना अटक पूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.

नवाब मलिकांच्या ED विरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी होणार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) नेते मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी विरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात बुधवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे (Mumbai Highcourt) न्यायमूर्ती एस. शुक्रे आणि न्यायमूर्ती सानप यांच्या खंडपीठापुढे उद्या सुनावणी होणार आहे. मात्र तिथं जर सुनावणी नाही झाली तर गुरूवारी यावर सुनावणी घेण्यात येईल असे, न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी याचिकाकर्त्यांना दिले निर्देश आहेत.

Russia-Ukraine War: खार्किव गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

- युक्रेनमध्ये मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

- परराष्ट्र मंत्रालयाची ट्विट करत माहिती

- मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.

- नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

- तो मुळचा कर्नाटकातील आहे.

महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा दिलासा

- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना हायकोर्टाचा दिलासा

- पुढील सुनावनी होईपर्यंत पोलिसांना कोणतिही कारवाई न करण्याचे न्यायालयाचे आदेश

- वरण भात लोन्चा अन कोन नाय कोंचावरुन वादाला सुरुवात झाली होती.

- तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली ग्वाही

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक

- उद्या भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक

- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार बैठक

- बैठक झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांची उद्या दुपारी पत्रकार परिषद ही होणार

- नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यावर विरोधक ठाम असून, अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता

अधिवेशन पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका

- शरद पवार उद्या सकाळी वाय बी चव्हाण इथे राष्ट्रवादी मंत्री आमदारांची बैठक घेणार

- संध्याकाळी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी महाविकास आघडीतील मंत्री,आमदारांची बैठक

यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

- IT विभागाच्या कारवाईनंतर आता MCA ने यशवंत जाधव यांच्याशी संबधित असलेल्या कंपन्यांचा झाडाझडती सुरू केली आहे.

- तसेच ज्या शेल्ड कंपन्यांच्या मदतीने जाधव यांनी पदेशात पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या कंपन्या ही MCA च्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती

आयकर विभागने सलग तीन दिवस यशवंत जाधव यांच्या घरी तळ ठोकू छापेमारी केली

दिलासदायक! कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासांत देशात 6915 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 915 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 16 हजार 864 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 29 लाख 31 हजार 45 झाली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 472 वर पोहोचली असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे.

अमरावतीत संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

(अरुण जोशी)

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी अमरावती मध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "कोरोना काळात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका" असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT