महाराष्ट्रात मतदार यादीतील घोळ उघड
चंद्रपूर आणि पालघर हॉटस्पॉट म्हणून समोर
एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे नोंद
निवडणूक आयोगाकडून तपासाची तयारी
चंद्रपूरच्या घुग्घूस गावात एकाच पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद आढळली आणि देशभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर साम टीव्हीने घरमालक सचिन बांदुरकर यांची भेट घेतली. तेव्हा घरात दोनच मत असल्याचं घरमालकानं सांगितलंय.
तर विधानसभा निवडणूक व्होट चोरी करुनच भाजपने जिंकली, असा आरोप काँग्रेसने केलाय. तर या यादीतील सत्यवती डाकूर यांचा आम्ही शोध घेतला. यावेळी त्या लुंगिनीनगरमध्ये राहत असून आपलं नाव घर क्रमांक 350 वर कसं गेलं? याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. मतदार यादीतील घोळ फक्त चंद्रपूरच नाही तर नाशिकमध्येही आढळला.इथे एकाच व्यक्तीची 3 वेगवेगळी व्होटींग कार्ड आढळून आली.
एवढंच नाही तर नालासोपाऱ्यातही सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं मतदार यादीत 6 वेळा नाव आढळून आलंय. त्याचा साम टीव्हीने शोध घेतला आणि धक्कादायक माहिती समोर आलीय. यावर प्रशासनानं मात्र मतदार नोंदणी करताना अनेक वेळा अर्ज केल्याने यादीत 6 वेळा नाव आल्याची सारवासारव केलीय. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग अधिकच उघडं पडत चाललंय. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला तडे जात असताना आयोग आपली इभ्रत वाचवण्यासाठी नेमके काय उपाय शोधणार? याबरोबरच निवडणूक आयोग बोगस मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.