SSC Board Saam Tv News
महाराष्ट्र

SC Grace Marks: १० मार्कांसाठी वाट्टेल ते! दहावीच्या वाढीव गुणांसाठी 'बोगसगिरी'; कोल्हापुरात दलालांचा सुळसुळाट

SSC Students Grace Marks Fraud: काही संस्था बोगस सर्टिफिकेट विकतात. ५०० ते १००० रूपयांमध्ये हे बोगस सर्टिफिकेट विकले जातात. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोगस सर्टिफिकेट विकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Bhagyashree Kamble

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत १० गुण दिले जातात. लोककला, चित्रकला यांसारख्या विविध गोष्टींसाठी बोर्डाच्या वतीनं १० गुण दिले जातात. यासाठी शाळांकडून प्रस्ताव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाकडे पाठवावे लागते. हे १० गुण आपल्या विद्यार्थ्याला मिळावेत यासाठी पालक शाळांमार्फत प्रस्ताव पाठवत असतात. पण या प्रस्तावांमध्ये देखील बोगसगिरी होत असल्याचं समोर आलंय. काही संस्था बोगस सर्टिफिकेट विकतात. ५०० ते १००० रूपयांमध्ये हे बोगस सर्टिफिकेट विकले जातात. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोगस सर्टिफिकेट विकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाने जवळजवळ ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे बोगस प्रस्ताव फेटाळले होते. यामध्ये कोल्हापूर बोर्डातील २३ हजार प्रस्तावांचा समावेश होता. अशा सर्टिफिकेट देणार्‍या शंभरहून अधिक संस्थांची मान्यताही काढून घेण्यात आली आहेत. विविध शाळांमध्ये अशा पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यासाठी काही अनोळखी एजंटचा वावर शाळांच्या परिसरात होतो. अशा एजंटला मुख्याध्यापकानं शाळेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

लोककला गुणांसाठी बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या संस्थांवर राज्य माध्यमिक बोर्डानं कारवाई केलीय. या कारवाईनंतर राज्यातील ५२ मान्यताप्राप्त संस्थांना सरकारने सर्टिफिकेट विकले असल्याच्या तक्रारी आहेत. कोणतीही कला न शिकता आणि कार्यक्रम न करताही केवळ ५०० ते १००० रूपयात हे सर्टिफिकेट विकत घेतले जातात. तसेच पालकांनी बोगस सर्टिफिकेट विकत घेत शाळांना दिले असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

या बोगस सर्टिफिकेटमुळे शाळांचाही चांगला निकाल लागतो. म्हणून काही शाळांनी तो प्रस्ताव पुढे पाठवला. काही शाळांनी सर्टिफिकेट बोगस असल्याचं लक्षात आल्यानंतर ते नाकारले. यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. बोगस सर्टिफिकेट सर्रास विकले जात असल्याचा प्रकार घडत आहे. यावर वेळीच आळा घालणे गरजेचं आहे. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे आलेल्या प्रस्तावांमध्ये किती बोगस संस्थांचे सर्टिफिकेट्स आहेत. हे मात्र छाननी केल्यानंतरच उघड होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT