पुढील महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू
परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान
जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
पुढील महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या दक्षता समितीच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर बारीक नजर असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. पुण्यात आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शिक्षण आयुक्तांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोर्डेचे अध्यक्ष डॉ.त्रिगुण कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोर्डेचे अध्यक्ष डॉ.त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी जी दक्षता समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यकारी अभियंता, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी असणार असून जिल्ह्यातील परीक्षा कॉपीमुक्त व निकोप वातावरणात पार पडण्याची जबाबदारी या समितीची असणार आहे.
तसेच परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची जिल्हा दक्षता समिती मार्फत खात्री करण्यात येईल,जिल्हयातील मोठ्या परीक्षक केंद्रासाठी प्रश्नपत्रिका नेणे व उत्तरपत्रिका गोव्या करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय वाहने अधिग्रहीत करून वाहने संबंधित केंद्रांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच राज्यातील उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा दक्षता समितीमार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करणे तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा दक्षता समितीमार्फत व्हिडीओ चित्रिकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. प्रत्येक भरारी पथकामध्ये किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश करण्यात येणार आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही देखील करण्यात येणार असल्याच यावेळी त्यांनी सांगितलं.
यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी जवळपास १६१४९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ५१११ केंद्रावर परीक्षा होणार आहे तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे.तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १५३२८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ३३८७ केंद्रावर परीक्षा होणार आहे तर १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
मागच्या वर्षी दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या ज्या केंद्रावर गैरप्रकार घडला आहे ती केंद्र बंद करण्यात आली असून नऊ विभागात बारावीच्या परीक्षेमध्ये घडलेल्या गैरप्रकार ७६ केंद्र बंद करण्यात आली आहे यात पुण्यातील १२,नागपूर १०,छत्रपती संभाजीनगर २८,मुंबई ०५,अमरावती ०७,नाशिक ०६, लातूर ०८ केंद्र बंद करण्यात आली आहे.तर दहावीच्या परीक्षेत ३१ केंद्रावर गैरप्रकार जे घडले ते केंद्र बंद करण्यात आले आहे यात पुण्यातील ०७, नागपूर ०६,संभाजीनगर १०,मुंबई ०१, लातूर ०७ केंद्र बंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.