

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी
हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १९ जानेवारी रोजी दहावीचे हॉल तिकीट जारी केले आहे.
दहावीचे हॉल तिकीट जारी
दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. त्याआधी बोर्डाने mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर हॉल तिकीट जारी केले आहेत. हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करु शकतात. हे हॉल तिकीट डाउनलोड करुन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट दिले जाणार आहे.
हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून हॉल तिकीट दिले जाणार आहे. या हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. जर सही, शिक्का नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
दहावीचे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं? (How to Download SSC Hall Ticket 2026)
सर्वात आधी mahahsscboard.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये एसएसएसी या पर्यायावर निवडायचे आहे.
यानंतर Login for Institute येईल. तिथे शाळांनी लॉग इन करायचे आहे.
यानंतर Sign in Here वर क्लिक करा.
यानंतर तुमचं Username आणि पासवर्ड टाकून सबमिट करा.
यानंतर रोल नंबर टाकून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा. या हॉल तिकीटची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.