Maharashtra Winter Session  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Winter Session : ५० खोके, एकदम ओके...अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना येण्यावर घातलेल्या बंदीसह राज्यपाल आणि सत्ताधारी नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. त्याची झलक आज पहिल्याच दिवशी दिसून आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसले. तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या विरोधकांना सरकारकडून 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. ते आज पहिल्याच दिवशी दिसून आले. (Maharashtra News)

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांनी पहिल्याच दिवशी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभांच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके, एकदम ओके अशा घोषणांचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजीही केली. (Winter Session

मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तकं दिली भेट

विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून, महापुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा गाजणार आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, तसेच इतर आमदारांनी मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तके भेट दिली. या पुस्तक वाटप कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांना रोहित पवार, अमोल मिटकरी, इंद्रनील नाईक, सुनील भुसरा, अतुल बेनके यांनी महापुरुषांची पुस्तके भेट दिली.

विधान भवनात शिवसेना कार्यालयाची विभागणी

विधानसभेत शिवसेना कार्यालयाची विभागणी करण्यात आली. शिवसेना कार्यालयातील चार खोल्यांपैकी दोन खोल्या ठाकरे गटासाठी, तर दोन खोल्या या शिंदे गटाला देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT