Maharashtra Winter session : आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येणार
Maharashtra Winter session
Maharashtra Winter sessionSaam Tv
Published On

सुशांत सावंत

Maharashtra Winter session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून खास रणनीती ठरवण्यात आली आहे. त्याच दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारनेही विरोधकांच्या रणनितीला प्रतिउत्तर देण्यासाठी खास योजना आखली आहे. विरोधकांनी गोधळ घातल्यास विरोधकांची अनेक प्रकरणे सरकार बाहेर काढ्याच्या पावित्र्यत आहे.

Maharashtra Winter session
Belagavi border dispute : दडपशाही सुरू; महामेळाव्याच्या परिसरात जमावबंदी, एकीकरण समिती नेत्यांची धरपकड

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसले. तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या विरोधकांना सरकारकडून 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. ते आज पहिल्याच दिवशी दिसून आले.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येणार आहे. आदित्य ठाकरे देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

Maharashtra Winter session
Pandharpur Bandh : 'मविआ' ची पंढरपूर बंदची हाक; जाणून घ्या शहरातील आजची स्थिती

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांनी पहिल्याच दिवशी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभांच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके, एकदम ओके अशा घोषणांचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजीही केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com