नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, पीकविमा, मराठा आणि धनगर यासारख्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. गेल्या वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे आता सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे सरकारची बाजू भक्कम झाल्याचे दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र, तरी देखील सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या हाती अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांना राज्य सरकार कसं उत्तर देतं? या अधिवेशनात कोणकोणते मोठे निर्णय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालेली नाही. कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. कांदा पिकाची अवस्था बिकट आहे. अशात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन सरकार नेमकं काय करत आहे?, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे विधासभेचे विरोधपक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी देखील सरकारवर टीकास्त्र डागलं. नागपूरकर डीसीएम हतबल झाले आहेत. आधी एकनाथ शिंदेंना सांभाळण्याचे काम दिल्लीतून दिले. नंतर बारामतीकराना सांभाळण्याचे काम दिले. त्यामुळे ते हतबल झाले आहे. चोर-चोर मिळून खाऊ अशी मंत्रीमंडळाची अवस्था आहे, असा टोला वडेट्टीवर यांनी हाणला.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.