Vijay Wadettiwar In Assembly Session: Saamtv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar News: 'अवयव विक्रीला काढले तरी लाज नाही...' विजय वडेट्टीवार संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला घेरलं

Vijay Wadettiwar News: दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Winter Session 2023:

हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session) दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या अधिवेशनात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली. दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"सरकारने ट्रीगर एक मध्ये 194 तालुके असताना केवळ 40 तालुकेच दुष्काळी घोषीत केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांच्या अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले आहेत. तरी सरकारला लाज वाटत नाही..." अशी टीका विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

तसेच "शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत अपेक्षित नाही. सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रूपये आणि बागायतीखालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान १ लाख रूपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे. 24 ऑगस्टला 2023 आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते..." असे वडेट्टीवार म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"देशातील जवळपास 37 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. राज्यात सुमारे 3000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकार गंभीर नाही. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी होरपळला असताना तुम्ही नियम, निकष, जीआरची भाषा करता. जीआर, नियम, निकष शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत असतील तर बदलले पाहिजेत.." अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.

"आस्मानी संकटाबरोबरच तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. तरी देखील तुम्ही उजळ माथ्याने राज्यात फिरताय. उरली सुरली थोडी शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करा. पीकविमा कंपन्यांचे मुजोर प्रतिनिधी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. अपमानास्पद वागणूक देत आहेत.." असेही वडेट्टीवार म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT