Maharashtra Assembly Monsoon Session 2024:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: 'खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा', अर्थसंकल्पावरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Assembly Monsoon Session 2024: आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे| मुंबई,ता. २९ जून २०२४

राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. काल शिंदे- फडणवीस सरकारकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज विधानसभेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी 'खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा लुटारू सरकार हाय हाय, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले.

विरोधक आक्रमक!

महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, बजेटमधून विधानसभेच्या तयारीच्या येतोय वास या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली.

अर्थसंकल्पावरुन जोरदार घोषणाबाजी

लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का अशी महायुतीची अवस्था आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण हा तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा आटापिटा आहे यावरून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भुल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या.

'खिशात नाही आण आणि मला बाजीराव म्हणा, लुटारू सरकार हाय हाय, 40 टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', या घोषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची पोलखोल केली. या घोषणांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान, यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT